पुणे, दि. १७ नोव्हेंबर, २०२३ : पुण्यातील मित्र फाउंडेशन यांच्या वतीने येत्या शनिवार दि. २५ नोव्हेंबर आणि रविवार दि. २६ नोव्हेंबर, २०२३ रोजी मित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी सायंकाळी ५.३० वाजता कर्वेनगर येथील पंडित फार्म्स या ठिकाणी महोत्सव संपन्न होईल. महोत्सवाचे दोन्ही दिवसांसाठीचे मिळून प्रवेश शुल्क नाममात्र रु १००/- फक्त इतके आहे.
मित्र फाउंडेशन तर्फे दरवर्षी गुरुजनांचा आणि गुणिजनांचा सत्कार करण्यात येतो. मित्र महोत्सवात दि. २६ नोव्हेंबर रोजी रविवारी ज्येष्ठ तबलावादक गुरु पं. सुरेश सामंत यांचा सत्कार करण्यात येईल. याबरोबरच जे विद्यार्थी संपूर्ण वेळ शास्त्रीय संगीत, गायन आणि वादनाचे शिक्षण घेत आहेत अशा १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गोखले यांनी दिली.

More Stories
खेड-शिवापूर परिसरात दुर्मिळ खवले मांजराचे रेस्क्यू; सुरक्षित वनपरिक्षेत्रात मुक्तता
पुण्यात हजारो MPSC स्पर्धकांचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा; कथित गैरप्रकारांवर कारवाईची मागणी
तुकाराम ओंबाळे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक: पोलीस आयुक्त अमितेश कुमार