पुणे, ४ मार्च २०२५ : पुणे महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी आज स्थायी समितीला सादर केला सादर केला. यावर्षी १२६१८.०९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असून, यात ७०९३ कोटीची महसूली कामे तर , ५५२४ कोटीची भांडवली कामे आहेत.
महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करताना यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी, महेश पाटील, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, लेखा वित्त अधिकारी मुलगा कळसकर, नगरसचिव योगिता भोसले, पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर उपायुक्त अविनाश सपकाळ आदी उपस्थित होते.
पुणे महापालिकेवर प्रशासकराज आल्यापासून प्रशासकामार्फत मानला जाणारा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे.
गेल्यावर्षी ११६०१ कोटीचा अर्थसंकल्प होता, त्यापैकी आत्तापर्यंत ६५०० कोटी रुपये जमा (५५ टक्के ) झाले आहेत. तर मार्च अखेर ८४०० कोटी जमा होतील असा दावा आयुक्तांनी केला आहे. मागच्या अर्थसंकल्पाच्या ७० टक्के खर्च केला.
आयुक्त भोसले म्हणाले, हा अर्थसंकल्प लोकांना उपयोगी पडावे यासाठी स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.
नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी परिमंडळ उपायुक्त स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन केली जाईल.
शहरी गरीब योजनेतून मदत केली जाईल. साथ रोग रोखण्यासाठी मेट्रो पाॅलिटीन सर्वेलन्स युनीट तयार करणार. यात प्रयोगशाळा, प्रशिक्षीत कर्मचारी असतील. एकता नगरी येथे क्लस्टर डेव्हलपमेंट केले जाणार असून त्यातील सुमारे साडेतीनशे नागरिकांना घरे दिली जाणार आहेत.
शहरातील स्मशानभूमिचे अद्ययावत करणे, मनपा मालकिच्या जागांचा किफायतशीर वापर करून उत्पन्न वाढवले जाईल, वाहतूक नियोजनासाठी प्रमुख ३३ रस्त्यांसाठी तरतूद, कोणत्याही कराची वाढ केली नाही, असे भोसले यांनी सांगितले.
समाविष्ट गावांसाठी ६२३ कोटीची तरतूद केली आहे यातून रस्ते पचदिवे सांडपाणी व्यवस्थापन कचरा आधी कामे केली जाणार आहेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेत ट्राफिक सेल अध्याय केला जाणार आहे.
भूसंपादनासाठी टीडीआर फायदेशीर ठरत नाही , त्यामुळे २०० कोटीपेक्षा जास्त निधी दिला आहे. मिसिंग लिंक ३३ कोटी भूसंपादनासाठी १५ कोटी, कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी ७५ कोटी, कामासाठी ५० कोटी तरतूद केली आहे, असे भोसले यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी
– अमृत महोत्सवी पुणे आरोग्य अभियान राबविणार
– मनपा शाळेसाठी सिस्टर स्कूल योजना , शाळेत सीसीटीव्ही बसविणार
– स्पर्धा परिक्षा केंद्र , सिटी लॅयब्ररी येथे सुरू करनार
– महांमदवाडीत स्पोर्ट्स काॅप्लेक्स
– टाकावू वस्तू पासून शिल्प करण्यासाठी तरतूद
– बांधकाम परवानगी सह अन्य सोईंसाठी अॅप करणार
– २०२४-२५ मध्ये काम हाती घेतले, त्य़ात समान पाणा पुरवठ्याचे १४१ झोनपैकी ७४ झोन पूर्ण ६६ टाक्या बांधून पूर्ण झाल्या.
– जायका ११ STP पैकी ५ प्लांट येत्या वर्षात पूर्ण होतील
– मेडीकल काॅलेज चांगल्यारित्या काम सुरू आहे. २०२५-२६ मध्ये बांधकाम पूर्ण होईल
– पीएमवाय मधून ४१७३ घरे माफक दरात देणार
– मुंढवा, बिंदू माधव ठाकरे चौकात ग्रेड सेपरेटर
– पीएमपी बस खरेदीसाठी तरतूद केली
– आयडब्लूएमएस सह प्रशासकीय कामासाठी इ आॅफिसचा वापर वाढवणार
– मनपा पद भरती करणार
– आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला जाईल
More Stories
पुणे: दहशतवादी हल्ल्या विरोधात भाजपाची निदर्शने
क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
‘एमपीएल’च्या तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज