September 14, 2024

तरुणांच्या हाती देशाची प्रगती – लेफ्टनंट कर्नल साहिल गौतम यांचे प्रतिपादन

पुणे, २७/०१/२०२४: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत मोहत्सवानिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्यावतीने लेफ्टनंट कर्नल साहिल गौतम यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी गौतम यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत तरुणांनी त्यांचे काम मन लावून करावे, त्यातूनच आपल्या देशाची प्रगती होईल असे प्रतिपादन केले.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर परिसरात या ध्वजारोहन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एचव्हीडीसीईसीचे डायरेक्टर आणि फाउंडर, निरव सुरतवाला, ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कर्नल गौतम म्हणाले, २६ जानेवारीला आपण भारतीय सावधानाचा स्वीकार करून ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. तरुणांनी आपलं काम मेहनीतीने करावे. त्यातून आपल्या देश आघाडीवर राहील असे सांगितले. तर सुरतवाला म्हणाले, या दिवसाचे महत्त्व म्हणजे प्रजेला खऱ्या अर्थाने सत्ता मिळाली. आता प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडण्याची गरज आहे. भारताला फार मोठी संधी आहे. या संधीचे सोने करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तरच आपल्या देशाची प्रगती होईल. ट्रस्टचे अध्यक्ष जावळे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.