पुणे, 13 मार्च 2026: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेत साखळी फेरीत न्यू इंडिया सॉकर क्लब, आयफा, फातिमा इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत शुभम राज(12मि.), झेफनिया मिनेझिस(22मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर न्यू इंडिया सॉकर क्लब संघाने रिअल पुणे युनायटेड एफसीचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. पराभूत संघाकडून हर्ष राठोड(46मि.) याने एक गोल केला.
दुसऱ्या सामन्यात रियान यादगिरी(2,9,10,16 मि.) याने नोंदवलेल्या चार गोलांच्या जोरावर आयफा संघाने थंडरकॅट्झ एफसी संघाचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. थंडरकॅट्झ एफसी संघाकडून अबुबकर मणियार(22मि.), इशान शर्मा(45मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. अन्य लढतीत आर्यन चौधरी(16मि.) याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या फातिमा इलेव्हन संघाने यूकेएम कोथरूड एफसी संघाचा 1-0 असा पराभव करून दुसऱ्या विजयची नोंद केली.
निकाल: साखळी फेरी: प्रथम श्रेणी:
न्यू इंडिया सॉकर क्लब: 2 (शुभम राज 12 मि., झेफनिया मिनेझिस 22 मि.) वि.वि. रिअल पुणे युनायटेड एफसी: 1(हर्ष राठोड 46 मि.);
आयफा: 6 (रियान यादगिरी 2,9,10,16 मि.,अबुबकर मणियार 22 मि., इशान शर्मा 45 मि.)वि.वि.थंडरकॅट्झ एफसी: 0;
फातिमा इलेव्हन: 1 (आर्यन चौधरी 16 मि.)वि.वि.यूकेएम कोथरूड एफसी: 0;

More Stories
एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सहा भारतीय खेळाडू दुसऱ्या फेरीत
युएस ओपन पिकलबॉल स्पर्धेत अर्जुन व आदित्य सिंग यांना तीन सुवर्णपदके
एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दिया रमेश, जेन्सी कानबर यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश