पुणे; 17 जानेवारी 2023: -भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे शहर यांच्या वतीने दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी नमो वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भात माहिती अध्यक्षा सौ हर्षदा फरांदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व सौ अमृता ताई फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणी या नमो वॉकेथॉन चा शुभारंभ होईल. ही वॉकेथॉन फर्ग्युसन कॉलेजच्या गेट नंबर ३ पासून सुरू होवून घोले रोड , बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना येथून पुन्हा फर्ग्युसन महाविद्यालय असा या वॉकेथॉन चा मार्ग असेल.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ५ महिलांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती सौ.फरांदे यांनी दिली.या पत्रकार परिषदेला सरचिटणीस प्रियांका शेंडगे, गायत्री खडके. आरती कोंढरे ,उज्वला गौड,भावना शेळके, खुशी लाटे, प्रेरणा तुळजापूरकर आदी उपस्थित होत्या.

More Stories
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : जागतिक सायकलपटूंसाठी पुण्याचा उत्साहवर्धक अनुभव
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ढोल-ताशे, शिवगर्जना आणि सेल्फी, प्रोलॉग रेसमध्ये पुणेकरांचा रंगारंग स्वागत
यंदाचे ‘एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन’ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना समर्पित