पुणे, 28 मार्च 2024: गोल्डलिफ एंटरटेन्मेंट यांच्या तर्फे व पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या मान्यतेखाली पुणे ओपन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नव्याने उभारण्यात आलेल्या हिंदू जिमखाना येथील फुटबॉल मैदानावर दि.13 एप्रिल पासून सुरु होणार आहे.
स्पर्धा संचालक अथर्व अय्यर यांनी सांगितले की, ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून नावनोंदणीची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
नावनोंदणीसाठी https://www. khelomore.com/events/event- details/goldleaf- entertainment/pune-open- football-tournament-/7 या संकेतस्थळावर अथवा 9226609487 / goldleafentertainmentoffici al@gmail.com येथे संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

More Stories
व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत केतकी थिटे, आध्या शाइन, नाझरीन फरझा, कनिष्क बिजार्निया यांची आगेकूच
व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत श्रेया भोसले, सारा साळुंके, तामिळनाडूच्या हरिणी राजा यांचे विजय
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत ट्रिनिटी व पीबीसीए यांच्यात अंतिम लढत