May 18, 2024

पीएमडीटीए मानांकन प्रेसिडेन्सी ज्युनिअर ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2023 स्पर्धेत आठ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

पुणे, 24 सप्टेंबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी व सोलींको प्रायोजित पीएमडीटीए मानांकन प्रेसिडेन्सी ज्युनियर ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात हर्ष काटकर, अरिंजय बांग, रेयांश जगताप, कबीर बोरसे, विहान साबू, वेदांत अग्रवाल, अहान भट्टाचार्य, पलाश जैन यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
विमाननगर येथील प्रेसिडेन्सी फेडल टेनिस अकादमी च्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत हर्ष काटकरने चौथ्या मानांकित समर सिद्धूचा 5-2 असा तर, अरिंजय बांगने पाचव्या मानांकित आदित्य उपाध्येचा 5-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. रेयांश जगतापने नवव्या मानांकित अयान जेमेनिसवर टायब्रेकमध्ये 5-4(5) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
कबीर बोरसे व विहान साबू यांनी अनुक्रमे श्रेयश चौटमहाल व सानिध्य देशपांडे यांचा 5-0 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. वेदांत अग्रवालने तेराव्या मानांकित आदिक रायखेरेला 5-3 असे पराभुत केले.
अहान भट्टाचार्य याने अकराव्या मानांकित शौर्य सूदला 5-1 असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 10वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:
ऋषभ ए (1) वि.वि.रयान जॉर्ज 5-3;
रेयांश जगताप वि.वि.अयान जेमेनिस(9)54(5);
कबीर बोरसे वि.वि.श्रेयश चौटमहाल(16) 5-0;
विहान साबू वि.वि.सानिध्य देशपांडे (15)5-0;
वेदांत अग्रवाल वि.वि.आदिक रायखेरे(13) 5-3;
वियान पेंडुरकर(8)वि.वि.विराज कुलकर्णी 5-3;
ओजस पवार(3)वि.वि.आकेश बिचुकले 5-1;
अरिंजय बांग वि.वि.आदित्य उपाध्ये(5) 5-3;
हर्ष काटकर वि.वि.समर सिद्धू (4)5-2;
हर्ष नागवानी(2)वि.वि.नील मोहरेल 5-0;
अहान भट्टाचार्य वि.वि.शौर्य सूद(11)5-1;
पलाश जैन वि.वि.शस्यकृती सुरा(14) 5-1;
10 वर्षाखालील मुली: दुसरी फेरी:
प्रज्ञा जैन वि.वि.तस्मई पोहाकर 5-2;
थीया देसाई वि.वि.युक्ता कुटे 5-1;
आदिरा भगत वि.वि.दिविजा सहाय 5-0;
आराध्या पवार वि.वि.वाणी चतुर 5-4(5);
सेजल जाधव वि.वि.आर्णा शर्मा 5-0.