पुणे, १० जानेवारी २०२५ : मोक्यातल्या गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या सराईत गुन्हेगाराला येरवडा कारागृहातून जामीन झाल्यानंतर त्याच्या टोळीने मिरवणूक काढल्याचा प्रकार शहरामध्ये घडला. त्यामुळे पोलिसांवर टीकेची जोड उठलेली असताना पोलिसांनी या गुन्हेगारांच्या पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या. या गुन्हेगाराच्या स्वागतासाठी येरवडा येथे स्वागत समारोह आयोजित केलेला होता, त्याचवेळी पोलिसांनी तेथे हजर होऊन गुन्हेगारांना ताब्यात घेतले आणि त्यांची वस्तीतून धींड काढली. त्यासोबत त्यांनी ‘देखो, सुनो आणि समज जानो वरणा आपकी भी यही हालत होगी’ असा संदेश या भागातील गुन्हेगारांना दिला आहे
प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे (रा. भीम ज्योत सर्वे नंबर 12 लक्ष्मी नगर येरवडा), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे यांना टक्के असून अन्य 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याप्रकरणी पोलीस हवालदार लहू एकनाथ गडमवाड यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवारी 7 जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास येरवडा कारागृहाच्या परिसरात सराईत गुन्हेगाराने मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आला. प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला होता. या प्रकरणात त्याला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी ही मिरवणूक काढल्याच्या समोर आले. रस्त्याने आरडाओरडा करणे, नागरिकांना शिवीगाळ करणे, दादागिरी करणे, वाहतूक कोंडी निर्माण करणे यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तसेच पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही अशी टीका नागरिकांनी सुरू केली. हा प्रकार येरवडा पोलिसांना कळताच त्याची त्यांनी गंभीर दखल घेतली.
घटनास्थळी पोलीस येईपर्यंत हे सर्व गुन्हेगार तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले. दुसऱ्या दिवशी बुधवारी या सराईत गुन्हेगारांचा लक्ष्मी नगर येथे स्वागत समारोह आयोजित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री नऊच्या सुमारास लक्ष्मी नगर येथे छापा टाकला. त्यावेळी या गुन्हेगारांच्या स्वागतासाठी मांडव टाकला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले त्यांच्या तोंडावर काळे कापड घातले त्यांना गुडघ्यातून वाकून लक्ष्मी नगर मधून धींड काढून आदल घडवली.
रस्त्याच्या दुर्फा थांबली या नागरिकांनी त्यांच्या भागात भाईगिरी करणाऱ्या गुन्हेगारांची काय अवस्था झाली आहे हे पाहिले तसेच या परिसरातील अन्य गुन्हेगारांना देखील पोलिसांनी वेळीच सुधारण्याचा इशाराही यावेळेस दिलेला आहे.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन