पुणे, ११ डिसेंबर २०२४ : शहर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. महापालिका प्रशासनाने सर्वंकष स्वच्छता (डीप क्लिनिंग) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेचे सर्व विभाग, त्यातील कर्मचारी एकत्र येऊन एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्वच्छता करण्यास सुरवात केली आहे ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातून सोमवारपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी ४० टन राडारोडा, ओला आणि सुका कचरा गोळा केला होता. दुस०या दिवशीही २० टन राडारोडा , २० टन कचरा गोळा करण्यात आला आहे.
शहरात सध्या ठिकठिकाणी कचरा पडला आहे. दुभाजक अस्वच्छ झाले आहेत. त्यातील झाडे वेडीवाकडी वाढली आहेत. रस्ते व्यवस्थित झाडल्या जात नसल्याने धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अतिक्रमणामुळे रस्त्यावर कचरा, खरकटे अन्न टाकण्याचे प्रकार वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. दैनंदिन स्वच्छता योग्य पद्धतीने केली जात नसल्याने व बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली जात नाही. ही स्थिती सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वंकष स्वच्छता (डीप क्लिनिंग) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी प्रभाग क्रमांक २० मध्ये पालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ६ टन राडारोडा, ओला कचरा ५ टन, सुका कचरा २ टन, गार्डन वेस्ट अडीच टन गोळा केला होता. प्रभाग क्रमांक २१ मध्ये राडारोडा १० टन, ओला कचरा सात टन, सुका कचरा पाच टन, गार्डन वेस्ट अडीच टन गोळा केला आहे. १ हजार ५८० मीटरच्या केबल तोडण्यात आल्या आहेत. स्ट्रीट लाईट पोलवरील ३० ठिकाणी खराब झालेली दिव्यांची झाकणे बदलण्यात आलेली आहेत. अलंकार चौक ते मालधक्का चौक या दरम्यानच्या १९ ड्रेनेज चेंबर्सची साफसफाई करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्त्यांची ६० स्क्वेअर मीटरची डागडुजी आणि फुटपाथची दुरुस्ती २५ स्क्वेअर मीटर करण्यात आली होती. . प्रभाग क्रमांक २१ मध्ये ७० स्क्वेअर मीटर रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. अतिक्रमण विभागाने हातगाडी, स्टॉल, लोखंडी काउंटर, नादुरुस्त वाहन चारचाकी वाहन पथारी दोन, असे या प्रकारे अतिक्रमण हटविले आहे. आकाश चिन्ह विभागाने ३५ बोर्ड आणि १२३ पोस्टर काढले आहेत. या मोहिमेत दुस०या दिवशी २० टन राडारोडा आणि २० टन कचरा गोळा करण्यात आला आहे. १४ हजार ६०० मीटरची केबल तोडण्यात आली आहे. स्ट्रीट लाईट पोलवरील १८ ठिकाणी खराब झालेली दिव्यांची झाकणे बदलण्यात आलेली आहेत.रस्त्यांची १३० स्क्वेअर मीटरची डागडुजी आणि फुटपाथची दुरुस्ती ४५ स्क्वेअर मीटर करण्यात आली होती. २ पावसाळी चेंबरची दुरूस्ती करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाने हातगाडी, स्टॉल, लोखंडी काउंटर, नादुरुस्त वाहन, चारचाकी वाहन, पथारी सात, असे या प्रकारे अतिक्रमण हटविले आहे. आकाश चिन्ह विभागाने २८ बोर्ड आणि ९६ पोस्टर काढले आहेत. यासाठी घनकचरा विभागाचे ५४३ कर्मचारी सहभागी झाले होते, असे घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले. स्थापत्य विद्युत विभागाचे १५, अतिक्रमण विभागाचे ६२, आकाश चिन्ह विभागाचे १८ आणि वृक्ष विभागाचे २५ कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.
१३० धाेकादायक झाडांच्या फाद्यांची छाटणी
थाेपटे चौक ते बीटी कवडे रोड ब्रिज पर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजुस ६० झाडे, रोशनी पेट्रोल पंप ते कल्यानीनगर ब्रिज रस्ता दोन्ही बाजु ३० झाडे, मालधक्का चौक ते एडी कॅम्प चौक ५० झाडे, रूबी हॉस्पीटल ते सिटी पाईट चौक दोन्ही बाजू २० झाडांंच्या फाद्यांची छाटणी करण्यात आली आहे.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन