पुणे, दि. १२/०४/२०२३ – मोटारीत बसलेल्या एकाचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी गाडीतील ६० हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना मध्यवर्ती शिवाजीनगरमधील मॉडर्न कॅफे परिसरात घडली. याप्रकरणी तिघा चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील भेडसगावकर (वय ५५ रा. नवी पेठ) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील हे ११एप्रिलला दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगरमधील मॉडर्न कॅफे परिसरात मोटारीत बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या तिघांनी निखील यांचे लक्ष विचलित करीत पैसे खाली पडल्याची बतावणी केली. त्यामुळे गडबडीत मोटारीतून खाली उतरत असताना चोरट्याने दुसर्या बाजूने मोटारीतून ६० हजारांची रोकड चोरुन नेली.काही वेळानंतर निखील यांना रोकडची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. पोलीस अमलदार सावरे तपास करीत आहेत.

More Stories
बारावीच्या लेखी परीक्षांना आजपासून सुरुवात; पुण्यात विद्यार्थ्यांचे औक्षण करून उत्साहात स्वागत
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; पुणे–पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना
Pune: मंजुषा नागपुरे महापौर, परशुराम वाडेकर उपमहापौर