पुणे, ५ जानेवारी २०२३: प्रभू श्रीरामचंद्र हे वनवासामध्ये असताना मांसाहार करत होते ते बहुजन होते असे वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुणे भाजप तर्फे राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत फिर्याद दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबिर शिर्डी येथे आयोजित केलेले असताना जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते त्यावेळी त्यांनी आराम हा बहुजन होता तो वनवासामध्ये असताना त्याने मांसाहार खाल्लेले आहे असे वक्तव्य केले त्यावरून राज्यभरात अवॉर्ड यांच्या विरोधात आंदोलने सुरू असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे याच पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी विश्रामबागवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती त्यानुसार आवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी आहे फिर्याद
मी धिरज रामचंद्र घाटे समक्ष विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर येथे हजर राहून जबाब देतो की, मी वर नमूद पत्त्यावर माझ्या कुटुंबीयांसह जन्मापासून राहण्यास आहे. मी मागील ३० वर्षांपासून भारतीय जनता पार्टी या पक्षाचा कार्यकर्ता असून सध्या मी भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष म्हणून कामकाज पाहात आहे.
दिनांक ०३/०१/२०२४ रोजी सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास मी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नामे राघवेंद्र दिपक मानकर यांच्या निंबाळकर तालिम चौक, सदाशिव पेठ, पुणे येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये एबीपी माझा या चॅनलवर बातम्यांचे लाईव्ह टेलिकास्ट बघत असताना श्री. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय शिबीराच्या व्यासपिठावरुन पक्षाच्या कार्यकत्यांशी संवाद साधताना ” प्रभू श्रीरामचंद्र हे १४ वर्षे वनवास भोगत असताना मांसाहार करत होते. तसेच प्रभू श्रीरामचंद्र हे बहुजनांचा राम शिकार करुन खाणारा राम, राम हा शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता “, अशी आणि यासारखी समाजामध्ये तणाव निर्माण करणारी प्रक्षोभक वक्तव्य पक्षाच्या अधिकृत व्यासपिठावरुन करत असल्याचे मी पाहिले.
श्री. जितेंद्र आव्हाड यांनी केलेली प्रक्षोभक वक्तव्ये ही त्यांच्या पक्षाच्या अधिकृत व्यासपिठावरुन त्यांच्या पक्षाच्या कार्यकत्र्यांशी संवाद साधताना केलेली असून येत्या २२ जानेवारीला अर्योध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमिवर देशाचा धार्मिक सलोखा, अखंडता बाधित करण्याकरीता त्यांनी हिन्दू धर्मियांचे श्रद्धास्थान असणा – या प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन जनतेच्या धार्मिक भावना दुखवल्यामुळे मी तक्रार देण्यासाठी आज रोजी पोलीस ठाणेस आलो.
तरी आमदार श्री. जितेंद्र आव्हाड यांनी दिनांक ०३/०१/२०२४ रोजी सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय शिबीराच्या व्यासपिठावरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हिन्दू धर्मियांचे श्रद्धास्थान असणा – या प्रभू श्रीरामाबद्दल ” प्रभू श्रीरामचंद्र हे १४ वर्षे वनवास भोगत असताना मांसाहार करत होते. तसेच प्रभू श्रीरामचंद्र हे बहुजनांचा राम शिकार करुन खाणारा राम, राम हा शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता “, अशी आक्षेपार्ह व प्रक्षोभक वक्तव्य करून जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या, म्हणून माझी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.

More Stories
रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत पुणे पुस्तक महोत्सवात प्रचंड गर्दी
फर्ग्युसन महाविद्यालय येथे १३ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन
जुन्नर वन विभागात 68 बिबटे जेरबंद; पिंजरे व समन्वित उपाययोजनांचा मोठा फायदा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी