May 10, 2024

पुणे: घरफोडी करणारा अल्पवयीन ताब्यात, २२ तोळे दागिने जप्त

पुणे, दि. २/०८/२०२३: जबरी घरफोडी केल्यानंतर पसार झालेला अल्पवयीन मैत्रिणीला भेटायला आल्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून २२ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. मौजमजा करण्यासाठी त्याने एका अल्पवयीन साथीदारासह घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. तसेच रिक्षा प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यात पोलिसांनी १५ लाख ४३ हजारांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ उपस्थित होते.

निंबाळकरवाडी वाघजाई माता अपार्टमेंट फेजमध्ये २३ जुलैला चोरट्यांनी केदार बाळकृष्ण सावंत यांच्या घरात चोरी करून ११ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला. दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ पोलीस शोध पथकाने घटनास्थळापासून ल २७ कॅमेराची पाहणी केली. त्यानुसार गुह्यात विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले . आरोपी मोबाईल देखील वापरत नसल्याने तांत्रीक दुष्टया शोध होत नव्हता.दरम्यान, अल्पवयीन त्याच्या मैत्रीणीला भेटण्यास कात्रज तलाव येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

रिक्षाने प्रवास करणाऱ्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.त्याच्याकडून ३ लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुदर्शन शिवाजी कांबळे, वय २२ रा वारजे म्हाडा कॉलनी, ओम सुरेश ढेबे, वय १८ रा चैतन्यनगर धनकवडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी तरुण आंबेगाव मध्ये जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करीत होता. त्यावेळी दोघांनी त्याला चाकूच्या धाकाने लुटले होते. याप्रकरणी अमंलदार अवधूत जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे यांना आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले असता अनेक गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.भारती विदयापीठ पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात १५ लाख ४३ हजारांचा ऐवज जप्त केला.ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त, स्मार्तना पाटील , एसीपी नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, एपीआय पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, एपीआय, वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता पोलीस अंमलदार हर्षल शिंदे धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अवधतु जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, नरेंद्र महांगरे,, आशिष गायकवाड, मंगेश पवार निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, शैलेश साठे, अभिजीत जाधव, महेश बारावकर, राहुल तांबे, विक्रम सावंत यांनी केली आहे.