पुणे, दि. १३/०८/२०२३: फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाखांचे दागिने आणि पार्विंâगमधील मोटार असा ६ लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १२ ऑगस्टला मध्यरात्री दोनच्या सुमारास नर्हेतील मल्हार प्राईडमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी महिला नर्हेतील मल्हार प्राईडमध्ये राहायल आहे. १२ ऑगस्टला महिला कामानिमत्त घराबाहेर होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील ३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्याशिवाय त्यांच्या मालकीची मोटारही चोरट्यांनी चोरून नेली. बाहेरहून आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या फ्लॅटशेजारील घरामध्येही चोरीचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार