पुणे, १०/०६/२०२३: नियोजित गृहप्रकल्पातील प्रवेशद्वाराची कमान कोसळून सात वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ठेकेदारासह दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्णव मिथीलेश राय (वय ७, सध्या रा. गुलमोहोर सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. अर्णवचे वडील मिथीलेश राय (वय ३६) यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठेकेदार सिराज मुल्ला, कामगार दाजीज इबन खान, रामप्रवेश राधेशाम राय (रा. पोरवाल रस्ता, लोहगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील नियोजित गुलमोहोर सोसायटीच्या आवारातील प्रवेशद्वार बांधकामाचे काम ठेकेदार सिराज मुल्ला याने घेतले आहे. प्रवेशद्वाराचे काम निकृष्ट केल्याने कमान कोसळली. कमानीचा काही भाग तेथे थांबलेला अर्णव राय याच्या अंगावर कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?