September 10, 2024

पुण्यातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, भारताला मिळाले अकरा सुवर्णपदक

पुणे, १०/०६/२०२३: गोवा येथील मनोहर पर्रीकर स्टेडियम मध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय साउथ एशिया कुंग फु चॅम्पियन स्पर्धेत पुण्यातील विद्यार्थ्यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली आहे .त्यामुळे या विद्यार्थ्यानी तब्बल अकरा गोल्ड , चार कास्य व दोन रौप्य पदक भारताला मिळवून दिली आहेत.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील भारत ,नेपाळ ,भूतान ,मालदीव ,श्रीलंका या देशांचा सामावेश होता .या स्पर्धेत तायची ,सांडा ,ताऊल ,तुईशू ,सुईझाओ ,विंगचुंन या खेळांचा प्रमुख सामावेश होता.

त्यांच्या या कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे . आज सकाळी सहा वाजता पुणेकर नागरिकांनी या मुलांचे हार , फुले ,गुच्छ तसेच पेढे भरवीत पुणे रेल्वे स्थानकात अत्यंत जल्लोशात स्वागत करण्यात आले .यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनानी रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला होता.

द्वितीय आतंरराष्ट्रीय साउथ एशिया कुंग-फु चॅम्पियनशिप स्पर्धा मनोहर पर्रीकर इंडोर स्टेडियम, मडगाव ,गोवा येथे संपन्न झाली.

शाओलीन कुंग फू मार्शल आर्ट्स अकॅडमी, पुणे या संस्थेच्ने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले होते .या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन 11 सुवर्ण पदक ,4 कांस्य पदक व 2 रौप्य पदक मिळून भारतीय संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
११ वर्षाखालील मुले ओजस भावे-(ताऊलू बेअर हॅन्ड प्रकार -सुवर्णपदक), (शॉर्ट वेपन -सुवर्णपदक) (सांडा (फाईट) वजन गट -28 किलो खालील मुले -रौप्य पदक) ,हर्षवर्धन धिरज मोरे- (सांडा (फाईट) -39 किलो वजन गटाखालील मुले- रौप्य पदक)
14 वर्षाखालील मुले ,दिव्यम कोल्हे- ताऊलू प्रकारात(शॉर्ट वेपन्स-कांस्यपदक) ,सुव्रत नामजोशी -(ताऊलू प्रकारात बेअर हॅन्ड -कांस्य पदक) ( शॉर्ट वेपन्स- सुवर्णपदक) ,अद्वैत जोशी- ताऊलू प्रकारात (शॉर्ट वेपन्स- रौप्य पदक)
17 वर्षाखालील मुले
ईशान पालेकर -(ताऊलू बेअर हॅन्ड -सुवर्णपदक) (लॉंग वेपन- सुवर्णपदक) ,साक्शत जोशी-(ताऊलू बेअर हॅन्ड -कांस्य पदक) (शॉर्ट वेपन्स- सुवर्णपदक)
14 वर्षाखालील मुली- अन्वेशा वाडेकर–(ताऊलू बेअर हॅन्ड -सुवर्णपदक) (शॉर्ट वेपन्स- सुवर्णपदक) ,जान्हवी गांगल–(शॉर्ट वेपन्स -सुवर्णपदक) ,अन्वया ठिगळे-ताऊलू (लॉंग वेपन- सुवर्णपदक)
17 वर्षाखालील मुली
सुखदा गायकवाड-(ताय-ची -सुवर्णपदक)
या सर्व विद्यार्थ्याना उमेश कोल्हे सर ( इंडिया टीम कोच ), सुनील उपाध्ये सर (टीम मॅनेजर)
सौ अर्चना कोल्हे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
साउथ एशिया कुंग फू फेडरेशन चे चेअरमन व डायरेक्टर शिफू सी एल लामा यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.
यावेळी गुरुदास कदम
डी वाय एस पी ,कोकण रेल्वे ,जॉन एस शिलशी आय पी एस गोवा यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते .