पुणे, १७ डिसेंबर २०२४: आज दुपारी २:३० वाजता पुण्यातील एका तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर एका कापड दुकानाला आग लागली. आगीमध्ये रहिवास्यांची सुटका करताना पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने एका चिमुकल्याला त्याचा वाढदिवसादिवशी वाचवले. अग्निशमन नियंत्रण कक्षाला २:३९ वाजता कोंढवा खुर्द येथील आगीची माहिती मिळाली.
पुणे अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रांपासून प्रत्येकी एक अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी पोहोचल्यावर अग्निशमन कर्मचाऱ्यांना तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर दोन कपड्यांच्या दुकानांमध्ये आग लागली होती. तेव्हा त्यांनी तत्काळ पाणी फेकून आग विझवण्यास सुरूवात केली आणि दुसऱ्या मजल्यावर आग पसरू नये यासाठी खबरदारी घेतली. त्यावेळी अग्निशमन दलाने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पाच महिलांना आणि तीन वर्षाच्या मुलाला श्वास घेण्याची साधने वापरून सुरक्षितपणे बाहेर काढले. सुमारे वीस मिनिटांत आग पूर्णपणे विझवली, ज्यामुळे अधिक मोठ्या अपघाताची शक्यता टळली.
आगीत कपडे, लाकडी वस्त्र, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि यांत्रिक साहित्य जाळले गेले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत एक महिलेच्या पायावर आणि एक अग्निशमन कर्मचाऱ्याच्या हातावर किरकोळ भाजले. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे, विशेषत: वाढदिवसाच्या दिवशी लहान मुलाला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे आभार आणि कौतुक व्यक्त केले.
सदर घटनास्थळी आज लहान मुलाचा वाढदिवस असताना त्याची दलाच्या जवानांनी केलेली सुखरुप सुटका याबद्दल स्थानिकांनी जवानांचे आभार मानत कौतुक केले. यावेळी वाहनचालक रविंद्र हिवरकर, सत्यम चौंखडे व जवान रफिक शेख, किशोर मोहिते, योगेश पिसाळ, सागर दळवी, निलेश वानखेडे, कुणाल खोडे, गोविंद गीते,हर्षल येवले, हर्षवर्धन खाडे यांनी सहभाग घेतला.

More Stories
पुणे ः मुंढवा जमीन व्यवहारावरून अंजली दमानिया आक्रमक; “सरकारने व्यवहार रद्द केला तर न्यायालयात जाईन”
पुणे ः बिबट्यांचे हल्ले ‘राज्य आपत्ती’ घोषित करण्याचा प्रस्ताव; बिबट्यांना शेड्यूल-१ मधून वगळण्याचे निर्देश — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यंदाची ३९ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ७ डिसेंबरला; पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात मात्र बदल