May 10, 2024

पुणे: कर्ज न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या, प्रियकर अटकेत

पुणे, १६/०९/२०२३: कर्जफेड न केल्याने प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मांजरी भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकास अटक केली.

राणी ऊर्फ रसिका रवींद्र दिवटे (वय २५, रा. घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आदर्श अजयकुमार मेनन (वय २५, रा. शारदा सेंटर, मांजरी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत चंदा दिवटे (वय ४८,रा. घोरपडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आदर्श मेनन आणि रसिका दिवटे यांचे प्रेमसंबंध होते. रसिकाने आदर्शच्या सांगण्यावरुन वेळोवेळी क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज तसेच लोन ॲपवरुन कर्ज काढून त्याला पावणेचार लाख रुपये दिले होते. कर्जाचे हप्ते आपण फेडू, असे आश्वासन तिले दिले होते. मात्र, त्याने कर्ज फेडले नाही.

गुरुवारी (१४ सप्टेंबर) रात्री रसिका त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाली. कर्ज फेडण्यास आदर्शने नकार दिला. त्यानंतर तिने पहाटे आदर्शच्या घरात पहाटे तीनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदर्शला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करत आहेत.