पुणे, दि. १८/०९/२०२३: मटणशॉप दुकानदाराला मावसभावाने सत्तूराचा धाक दाखवून चोरट्याने १५ हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना १७ सप्टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास घोरपडे पेठेतील गुडलक मटण शॉपमध्ये घडली.
शार्जिल उर्फ शाला लतीफ शेख वय ३० याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल शेख (वय २५रा. लष्कर कॅम्प) याने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शार्जिल हा सोहेलचा मावसभाउ असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. १७ सप्टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास सोहेल मटणशॉपमध्ये होता. त्यावेळी शार्जिलने त्याठिकाणी येउन कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील १५ हजाराची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

More Stories
बनावट वेबसाइट्स,अॅप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन
पुणे विमानतळातील बिबट्या यशस्वीपणे बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या पकडला
शिवसेनेची १६५ जागा लढविण्याची तयारी – महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर