पुणे, २९ जुलै २०२३: वारंवार समाजातील तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करत तरुणांची माथी भडकविणाऱ्या मनोहर भिडे नामक व्यक्तीने पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत.देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा घाणेरडा प्रकार आहे. देशाच्या राष्ट्रपित्यावर अवमानकारक शब्दांमध्ये वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी महाराष्ट्राच्या गृह विभागाने तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करत, त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात याविरोधात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.
या आंदोलन प्रसंगी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप , अंकुश काकडे, रवींद्र मालवदकर, सुषमा सातपुते, किशोर कांबले, मृणाल वाणी, तन्वीर शैख़ , आजिंक्य पालकर, आशीष माने, शेखर धावड़े, गणेश नलावडे, सानिया झुंझारराव, उदय महाले आणि सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार