पुणे, २४ ऑगस्ट २०२४: बदलापूर कोल्हापूर यासह राज्यांमध्ये इतर ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. पण उच्च न्यायालयाने हा बंद करण्यास नकार दिल्याने मुक आंदोलनाची घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती. आज सकाळी पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भर पावसात शरद पवार यांनी तासभर ठाण मांडून या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन केले. मुसळधार पाऊस सुरू असला तरी एकही कार्यकर्ता व पदाधिकारी डगमगला नाही. यावेळी राज्य सरकार अस संवेदनशील असल्याची टीका केली.
बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात नराधमांच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक विरोधी पक्षांनी दिली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात घ्यावा घेऊन या बंदाविरोधात म्हणणे मांडले. ते मान्य करून उच्च न्यायालयाने विरोधकांना महाराष्ट्र बंद करता येणार नाही जर बंद केल्यास राजकीय पक्षांवर कारवाई केली जाईल असे आदेश दिले होते. त्यामुळे विरोधकांचा बंद करण्याचा डाव फसलेला असला तरी पावसामध्ये आंदोलन करून त्यांनी आज बाजी मारून नेली. सकाळी दहाच्या सुमारास शरद पवार आहे आंबेडकर पुतळा येथे आले पाऊस सुरू असतानाही त्यांनी तेथे ठाण मांडून बसले काँग्रेस बुद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते देखील यावेळी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, बदलापूर येथीलल घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे. राज्यकर्त्यांना जाण राहीलेली नाही. या घटनेवर त्यांना कारवाई करायची आहे. महाराष्ट्रात एक दिवस असा जात नाही, ज्यात कुठे तरी भगिनीवर अत्याचार झाल्याची बातमी येत नाही. आता पर्यंत जे घडले आहे त्याची गांभिर्याने दखल सरकारने घेतली पाहीजे.
मला एका गोष्टीचे वाईट वाटते, राज्यकर्ते म्हणतात विरोधक या घटनेचे राजकारण करत आहेत. राज्यकर्ते कीती अंसवेदनशील आहे हे यातुन दिसते.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान