पुणे, १५/०९/२०२३: नामांकित फॅमिली फिजिशियन हृदयरोग आणि मधुमेह तज्ञ डॉ. आश्विनीकुमार मानकोसकर यांच्या वतीने व मानकोसकर क्लिनिकतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ४ वेळेत कर्वेनगरमधील ताथवडे उद्यानाशेजारील मधुबन कॉलनीतील मानकोसकर क्लिनिक मध्ये हे आरोग्य शिबीर घेण्यात आले आहे. यात अस्थि घनता परीक्षण, मधुमेह निरोपथी तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्त शर्करा तपासणी, ऍसिडिटी तपासणी, शरीराच्या विविध तपासण्या मोफत करण्यात येणार असल्या बरोबर फिजिओथेरपी मार्गदर्शन यांचा समावेश आहे. तसेच यावेळी नेत्रदान रजिस्ट्रेशन व केंद्र सरकारचे आयुष्मान भारत डिजिटल मिशन’(आभा) अंतर्गत डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) यावेळी काढण्यात येणार आहे.
डॉ. आश्विनी कुमार मानकोसकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना फायदा होणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात अनेक नामांकित हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सहभागी होणार आहे.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन