पुणे, २२/०९/२०२३: तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बजरंग जयवंत रुमाले (वय २१) आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत तरुणीचे आजोबा नांदेड येथे राहायला होते. आजोबांचे निधन झाल्याने ती नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमालेशी तिची ओळख झाली.
आजाेबांच्या निधनानंतर तरुणी पुण्यात परतली. त्यानंतर रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले. तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
तरुणीला धमकावून रुमालेने बोपदेव घाटात नेले. तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केले. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन