पुणे, १६/०९/२०२३: शाळकरी मुलीचा वर्गमित्राने विनयभंग केल्याची घटना डेक्कन जिमखाना भागातील एका शाळेत घडली. याप्रकरमी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका १५ वर्षीय मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी डेक्कन जिमखाना भागातील एका शाळेत नववीत शिकते. ते अनाथ असून एका संस्थेत ती राहते. मधल्या सुट्टीत शाळकरी मुलगी मैत्रिणींबरोबर निघाली होती. त्यावेळी मुलाने तिला चापट मारली. मुलीने वर्गशिक्षिकेकडे तक्रार दिली. मुलगी मैत्रिणींबरोबर शाळेच्या आवारात खेळत होती. त्यावेळी मुलाने तिच्याशी अश्लील वर्तन केले.
मुलगी अनाथ असल्याने तिने बालकल्याण समितीकडे तक्रार दिली. याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडे तिने तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार तपास करत आहेत.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन