May 4, 2024

पुणे: 46 लाखांच्या मेफेड्रॉन, चरसची तस्करी अन विक्री, चौघांना अटक

पुणे, १६/०८/२०२३: अमंली पदार्थाची तस्करी करून एम.डी. कोकेनची तस्करी करत त्याची विक्री करणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 ने बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून 46 लाख 59 हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

सागर कैलास भोसले (26, रा. शितोळे बिल्डींग, शंकरनगर, खराडी) त्याची साथीदार महिला, तसेच अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (40, रा. गुडविल ऑरचीड, धानोरी), इम्ररीन गॅरी ग्रीन (37, रा. खेसे पार्क, लोहगाव रोड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दि. 14 ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेच्या अमंली पदार्थ विरोधी पथक 1 हे मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अमंलदार विशाल दळवी यांना लोणकर वस्ती येथे एक महिला आणि एक व्यक्ती एमडी कोकेन पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. याबाबत दळवी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक वियक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांना माहिती दिली. त्यानुसार लोणकर वस्ती येथे छापा टाकून सागर भोसले याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून 44 लाख 11 हजाराचे 208 ग्रॅम 650 मिलीग्रॅम मेफेड्रॉन व 5 ग्रॅम 550 मिलीग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

दरम्यान अंमली पदार्थाची तस्करी अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (40, रा. गुडविली ऑरचीड, धानोरी) याच्याकडून होत असल्याने त्याला आणि त्याचा साथीदार इम्ररीन गॅरी ग्रीन (37, रा. खेसे पार्क, लोहगाव रोड) यांना अटक करण्यत आली त्याच्याजवळूनही कोकेन आणि चरस असा तब्बल 2 लाख 48 हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, अमंलदार मारूती पारधी, मनोज साळुंके, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर यांच्या पथकाने केली.