पिंपरी-चिंचवड, ४ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांना, चाकण, हिंजवडी, तळवडे या ठिकाणी नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी जात असताना ट्राफिक समस्येमुळे होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फेडरेशन प्रतिनिधींची बैठक लावावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे. याबाबत आमदार महेश लांडगे यांना साकडे घातले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांना व्यवसायानिमित्त, नोकरी निमित्त चाकण, हिंजवडी तळेगाव, तळवडे या ठिकाणी जात असताना या सर्व मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात ट्राफिक ची समस्या असल्याने. या ठिकाणी व्यवसायासाठी नोकरीसाठी पोहोचण्यासाठी चार-पाच तास लागतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तर या अडचणीमध्ये आणखीन भर पडली असल्याने. पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटी धारकांना या ठिकाणी जात असताना खूप वेळ लागतो त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांचा वेळ तर खर्च होतोच त्याचप्रमाणे तासनतास वाहने चालू राहत असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर इंधनावर देखील खर्च होतो. हा एक प्रकारे आपल्या देशाच्या साधन संपत्तीचा देखील आपव्यय होत असल्याने ही आपल्या पिंपरी चिंचवड शहराची आणि पर्यायाने देशाची आर्थिक हानीच आहे. त्यामुळे कृपया या ट्रॅफिकच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सध्या चालू असणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण हा विषय माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मांडून पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांसाठी काम करत असलेल्या आमच्या सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधीची माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी, अशी मागणी संजीवन सांगळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वाहतूक समस्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांची वेळेची खूप मोठ्या प्रमाणात हानी आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी लागणाऱ्या वाहनांसाठी इंधनावर देखील खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ही खूप दिवसांपासूनची आमची समस्या आहे. त्यामुळे यावर पर्याय काढण्यासाठी महेश लांडगे यांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांच्या सोबत पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करावी, अशी आमची मागणी आहे.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- मोशी – पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी.
More Stories
पुणे: पिंपरी चिंचवडमधील पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र; लवकरच कामाला सुरुवात
पुणे: वाकड ते मामुर्डी दरम्यान अंडरपासजवळील वाहतूक कोंडीवर तोडगा; चिंचवड आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
पुणे: पिंपरी चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कामगिरी, ९० दिवसांमध्ये केली ५२२ कोटींची कर वसुली