पुणे, ११ जानेवारी २०२५: महापालिकेच्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेसाठी या वर्षी तब्बल साडे तेरा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, या प्रक्रियेत विविध तांत्रिक कारणांमुळे ये अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांची पुर्नपडताळणीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. दहावी व बारावीममध्ये उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेसामधील गुणवंत विद्यार्थ्यांकडुन संबंधित योजनेसाठी महापालिकेकडे
शहरातील विविध मागासवर्गीय व खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी महापालिका प्रशासनाकडुन काही वर्षांपुर्वी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना’, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना’ अशा दोन योजनांच्या माध्यमातुन गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाते. महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातुन या योजना राबविण्यात येतात. अर्थसहाय्य योजनेसाठी महापालिकेकडुन १७ कोटी रुपयांची आर्थिक तरतुद करण्यात आली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या “मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजने’साठी २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. त्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांपेक्षा अधिक, तर ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करता येते. या योजनेसाठी यंदा ३ हजार ४९१ इतके अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६४७ अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे बाद झाले आहेत. २ हजार 844 अर्ज मंजुर करण्यात आले आहेत. तर आणखी२१३ अर्ज प्रलंबित आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजने’साठी १५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ७० टक्के, तर ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज दाखर करता येतो. या योजनेसाठी १० हजार १४७ इतक्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ८ हजार १४७ अर्ज मंजुर झाले असून २हजार अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत. तर ६५० अर्ज प्रलंबित आहेत. दरम्यान, काही तांत्रिक कारणामुळे बाद झालेले विद्यार्थ्यांचे अर्ज पुर्नपडताळणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
उपायुक्त नितीन उदास म्हणाले, “शहरातील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेचा चांगला लाभ मिळतो. संबंधित योजनांसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात अर्थसहाय्य जमा होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळतो.”
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन