पुणे, ०२/०९/२०२३: हडपसर भागातील रामटेकडी परिसरात दारु पिताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महादेव रघुनाथ मोरे (वय २६, रा. काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन पाच मुलांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महादेव आणि अल्पवयीन मुले ओळखीची आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. मध्यरात्री महादेव आणि अल्पवयीन मुले रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळ डोंगरावर मोकळ्या जागेत दारु प्यायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. अल्पवयीन मुलांनी महादेवला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, वैमनस्यातून महादेवचा खून करण्यात आल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी दिली.

More Stories
रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत पुणे पुस्तक महोत्सवात प्रचंड गर्दी
फर्ग्युसन महाविद्यालय येथे १३ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन
जुन्नर वन विभागात 68 बिबटे जेरबंद; पिंजरे व समन्वित उपाययोजनांचा मोठा फायदा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी