पुणे, १६/०९/२०२४: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या वतीने 14 सप्टेंबर 2014 रोजी हिंदी दिवस आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून प्रो. डॉ. नवनीत चौहान उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी हिंदी भाषेच्या समृद्धीवर आणि तिच्या रोजगार निर्माण क्षमतेवर प्रकाश टाकला.
प्रो. चौहान यांनी हिंदी सिनेमाचे आणि गाण्यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअरच्या अपार संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यांनी अनुवाद, जाहिरात आणि इतर क्षेत्रांमध्ये देखील रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. याचबरोबर, त्यांनी आपल्या अभिनय शैलीने विद्यार्थ्यांना नाट्यकलेचे प्रशिक्षणही दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सह-कुलगुरू प्रो. डॉ. पराग काळकर यांनी हिंदी भाषेच्या अधिकाधिक वापरावर आणि तिला जागतिक स्तरावर नेण्याच्या गरजेवर भर दिला.
या सोहळ्यात सदानंद भोसले लिखित हिंदी काव्य संग्रह ‘शलू पर उम्मीद के फूल’ आणि डॉ. नितीन लिखित ‘मानवीय अधिकारों का महायुद्ध’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
केरळ विद्यापीठाचे प्रो. आर. जयचंद्रन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे आणि हिंदी विभागाचे सर्व अध्यापक, अधिकारी व विद्यार्थ्यांसह संबंधित महाविद्यालयांतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना विभागप्रमुख प्रो. सदानंद भोसले यांनी केली, तर आभार प्रदर्शन डॉ. महेश दवंगे यांनी केले.
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
पुणे: महापालिका आयुक्त गेले आणि उघड झाली स्वच्छतेची सगळी पोलखोल; ५५ कोटींचा प्रस्तावही फेटाळला