मुंबई, 21 नोव्हेंबर 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताच्या सिद्धार्थ विश्वकर्मा याने युक्रेनच्या चौथ्या मानांकित व्लादिस्लाव ऑर्लोव्हचा 7-6(2), 6-3 असा पराभव करून आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत भारताच्या सिद्धांत बांठियाने जपानच्या काझुमा कवाचीचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(5), 6-1 असा पराभव केला. कोरियाच्या युनसेओक जंग याने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या संदेश कुरळेचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करून आगेकुच केली. भारताच्या सहाव्या मानांकित सिद्धार्थ रावतने नितीन कुमार सिन्हाचा 7-5, 6-3 असा तर, देव जावियाने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या पार्थ अग्रवालचे आव्हान 6-1, 5-7, 6-3 असे मोडीत काढले. ऑस्ट्रियाच्या आठव्या मानांकित डेव्हिड पिचलरने भारताच्या सार्थक सुडेनला 6-2, 6-0 असे पराभूत केले.
याआधी अंतिम पात्रता फेरीत पंधराव्या मानांकित आर्यन शहाने सातव्या मानांकित ऋषी रेड्डीचा 6-4, 7-5 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. चौथ्या मानांकित रोहन मेहराने व्हिएतनामच्या हा मिन्ह डक वूचा 6-3, 4-6, 10-7 असा तर, आठव्या मानांकित भारताच्या शिवांक भटनागरने नेपाळच्या अभिषेक बस्टोलाचा 6-7(5), 6-1, 10-5 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. याआधी स्पर्धेचे उदघाटन आयटीएफ वर्ल्ड टेनिस टूरचे मुख्य अँड्र्यू मॉस, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, आयटीएफ सुपरवायझर अमोर्न दुआंगपिंकीन आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम पात्रता फेरी: पुरुष गट:
र्योतारो टगुची (जपान)[2]वि.वि.जगमीत सिंग(भारत)[16] 6-0, 6-1;
रोहन मेहरा(भारत)[4]वि.वि.हा मिन्ह डक वू (व्हिएतनाम)[12] 6-3, 4-6, 10-7;
हॅरिसन अॅडम्स(अमेरिका) [1]वि.वि. गॅब्रिएल व्होल्पी(इटली)[9] 6-3, 6-2;
मधवीन कामथ(भारत)[3]वि.वि.आदिल कल्याणपूर(भारत)[14] 6-4, 6-2;
भरत निशोक कुमारन(भारत)[5]वि.वि.अजय मलिक(भारत)[11] 3-6, 6-1, 10-1;
कबीर हंस (भारत)[6] वि.वि.दीपक अनंतरामू(भारत) 6-3, 6-3;
आर्यन शहा(भारत)[15]वि.वि.ऋषी रेड्डी (भारत)[7] 6-4, 7-5;
शिवांक भटनागर(भारत)[8]वि.वि.अभिषेक बस्टोला(नेपाळ) 6-7(5), 6-1, 10-5;
मुख्य ड्रॉ: एकेरी: पहिली फेरी:
सिद्धार्थ विश्वकर्मा(भारत)वि.वि.व्लादिस्लाव ऑर्लोव्ह(युक्रेन)[4] 7-6(2), 6-3;
सिद्धांत बांठिया(भारत)वि.वि.काझुमा कवाची(जपान)3-6,7-6(5), 6-1;
युनसेओक जंग(कोरिया)वि.वि.संदेश कुरळे(भारत) 6-0, 6-2;
सिद्धार्थ रावत(भारत)[6]वि.वि.नितीन कुमार सिन्हा(भारत)7-5, 6-3
देव जाविया(भारत)वि.वि.पार्थ अग्रवाल(भारत)6-1, 5-7, 6-3;
डेव्हिड पिचलर(ऑस्ट्रिया)[8]वि.वि.सार्थक सुडेन(भारत) 6-2, 6-0.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय