पुणे,दि.21 नोव्हेंबर 2023: एम टेनिस अकादमी व शेपींग चॅम्पियन्स यांच्या संलग्नतेने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात लकी लुझर ठरलेल्या वैष्णव रानवडेने तिसऱ्या मानांकित सनत कडलेचा 7-6(7), 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अव्वल मानांकित स्मित उंडरेने आश्रित मज्जीचे आव्हान 6-0, 6-4 असे संपुष्टात आणले. सहाव्या मानांकित नमिश हुडने अंशुल पुजारीवर 6-2, 6-1 असा विजय मिळवला. चौथ्या मानांकित स्वर्णिम येवलेकरने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अनिश वडनेरकरचा 7-6(6), 6-4 असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. पाचव्या मानांकित त्रिशिक वाकलकरने आरुष पोतदारला 6-4, 7-5 असे पराभूत केले.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित श्रावी देवरेने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत अयाती तुडयेकरचा 6-0, 6-0 असा पराभव केला. सहाव्या मानांकित प्रार्थना खेडकरने आयुश्री तरंगेचा 6-2, 6-4 असा तर, तिसऱ्या मानांकित काव्या देशमुखने सारा फेंगसेचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चौथ्या मानांकित रित्सा कोंडकरने मायरा शेखचा 6-2, 4-6, 6-0 असा तीन सेटमध्ये संघर्षपुर्ण पराभव केला. लकी लुझर ठरलेल्या ओवी मारणे हिने शेरयल राजचा 6-1, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली.
निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी: मुले:
स्मित उंडरे(1)वि.वि.आश्रित मज्जी 6-0, 6-4;
नमिश हुड(6)वि.वि.अंशुल पुजारी 6-2, 6-1;
स्वर्णिम येवलेकर(4)वि.वि.अनिश वडनेरकर 7-6(6), 6-4;;
त्रिशिक वाकलकर(5)वि.वि.आरुष पोतदार 6-4, 7-5;
आर्यन किर्तने(8)वि.वि.अथर्व डकरे 6-0, 6-1;
वैष्णव रानवडे वि.वि.सनत कडले(3) 7-6(7), 6-2;
मुली:
श्रावी देवरे(1)वि.वि.अयाती तुडयेकर 6-0, 6-0;
प्रार्थना खेडकर(6)वि.वि.आयुश्री तरंगे 6-2, 6-4;
काव्या देशमुख(3)वि.वि.सारा फेंगसे 6-2, 6-3;
अवनी देसाई(8)वि.वि.जान्हवी सावंत 6-4, 6-2;
रित्सा कोंडकर(4)वि.वि.मायरा शेख 6-2, 4-6, 6-0;
ओवी मारणे वि.वि.शेरयल राज 6-1, 6-2.

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय