May 18, 2024

ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जणांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

पुणे – दिनांक ०३\११\२०२३ रोजी दुपारी ११ वाजून ५० मिनिटे यावेळी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात ससून रुग्णालय (नवीन इमारत) येथे लिफ्ट अडकली असून आतमध्ये काही इसम अडकले आहेत अशी वर्दि मिळाली. त्याचवेळी अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून एक फायरगाडी व एक रेस्क्यु व्हॅन तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

घटनास्थळी पोहोचताच ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत (क्रमांक १००) चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट सुमारे तासभर अडकली असून आतमध्ये सहा जण असल्याची खाञी झाली असता जवानांनी लिफ्टमध्ये असणारया लोकांना “घाबरू नका; आम्ही आहोत” असे म्हणत धीर दिला. काही जवानांनी अकरा मजली असलेल्या इमारतीच्या गच्चीवर जात लिफ्ट रुममधून सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याचवेळी खाली लिफ्ट अडकलेल्या ठिकाणी लोकांची भेदरलेली परिस्थिती व गुदमरलेली स्थिती पाहत तातडीने एका फॅनची व्यवस्था करुन हवेचा स्तोञ सुरू केला व त्यांची श्वशन यंञणा व्यवस्थित राहिल याचा ही प्रयत्न केला. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लिफ्टचा दरवाजा वाकवत व ओमेगा कंपनी लिफ्टच्या कर्मचार्यांसमवेत सातव्या मजल्यावर जाऊन लिफ्ट चालू बंद करत रुग्णालयाचे चार कर्मचारी (तीन पुरुष एक महिला) व दोन नागरिक (पुरुष) अशा एकुण सहा जणांची ठिक १२ वाजून ३२ मिनिट सुखरुप सुटका करत त्यांना एकप्रकारे जीवदान दिले.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, प्रशांत गायकर व वाहनचालक सचिन चव्हाण, ओंकार साखरे तसेच तांडेल सुनिल नामे आणि जवान भुषण सोनावणे, केतन नरके, परेश जाधव, अक्षय शिंदे यांनी सहभाग घेतला.