पुणे, १४ एप्रिल २०२५: उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद आता किफायतशीर दरात घेण्याची संधी पुणेकरांसाठी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ने पर्यटक, भाविक व निसर्गप्रेमींसाठी खास वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवा सुरू केली आहे. ही सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार, तसेच सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी चालवण्यात येणार आहे.
परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, “पुणे दर्शन”च्या धर्तीवर सुरू झालेल्या या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून विविध धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या १० वेगवेगळ्या मार्गांची आखणी करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गासाठी सकाळी ९ वाजता बस रवाना होऊन सायंकाळी ६.३० पर्यंत परत येते. तिकीट दर सर्व मार्गांसाठी फक्त ₹५०० असून प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रमुख मार्गांमध्ये हे ठिकाणे समाविष्ट:
– जेजुरी, मोरगाव गणपती, कानिफनाथ गड
– नारायणपूर, म्हस्कोबा मंदिर
– सिंहगड, पानशेत धरण, गोकुळ फ्लॉवर पार्क
– निलकंठेश्वर, झपूर्झा संग्रहालय
– प्रतिशिर्डी, देहू-गाथामंदिर
– राजगुरूनगर, आळंदी
– रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम
– सत्य साईबाबा आश्रम, हाडशी
– वाघोली, तुळापुर, रांजणगाव गणपती, भीमा कोरेगाव विजय स्तंभ
बससेवेचा पहिला आणि शेवटचा थांबा संबंधित मार्गानुसार हडपसर गाडीतळ, डेक्कन जिमखाना किंवा पुणे स्टेशन येथे असेल. दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळ्यात नागरिकांच्या सहलीसाठी ही सेवा लाभदायक ठरणार आहे.
१. बससेवा क्रमांक १:
हडपसर गाडीतळ – स्वारगेट – इस्कॉन मंदिर (कोंढवा रोड) – श्रीक्षेत्र कानिफनाथ गड – मोरगाव गणपती – जेजुरी – सासवड – स्वारगेट – हडपसर गाडीतळ
२. बससेवा क्रमांक २:
हडपसर गाडीतळ – स्वारगेट – सासवड (सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर) – नारायणपूर (एकमुखी दत्त मंदिर, नारायणेश्वर मंदिर) – श्रीक्षेत्र म्हस्कोबा मंदिर – कोडी – सासवड – स्वारगेट – हडपसर गाडीतळ
३. बससेवा क्रमांक ३:
पुणे स्टेशन – डेक्कन जिमखाना – स्वारगेट – शिवसृष्टी (आंबेगाव) – स्वामी नारायण मंदिर – नन्हे – कोंढणपूर – तुकाईमाता मंदिर – बनेश्वर मंदिर – अभय आरण्य – बालाजी मंदिर (केतकावळे) – स्वारगेट
४. बससेवा क्रमांक ४:
पुणे स्टेशन – डेक्कन जिमखाना – पु. ल. देशपांडे गार्डन – खारावडे – म्हसोबा देवस्थान – नीलकंठेश्वर पायथा – झपूर्झा संग्रहालय – घोटावडे फाटा – डेक्कन जिमखाना – पुणे स्टेशन
५. बससेवा क्रमांक ५:
पुणे स्टेशन – डेक्कन जिमखाना – खडकवासला धरण – सिंहगड पायथा – गोकुळ फ्लॉवर पार्क – गोळेवाडी – पानशेत धरण – डेक्कन जिमखाना – पुणे स्टेशन
६. बससेवा क्रमांक ६:
पुणे स्टेशन – स्वारगेट – हडपसर – रामदरा – थेऊर गणपती – प्रयागधाम – हडपसर – स्वारगेट – पुणे स्टेशन
७. बससेवा क्रमांक ७:
पुणे स्टेशन – स्वारगेट – वाघेश्वर मंदिर (वाघोली) – वाडे बोल्हाई मंदिर – तुळापुर – त्रिवेणी संगम – छत्रपती संभाजी महाराज समाधी (वढू बुद्रुक) – रांजणगाव गणपती – भीमा कोरेगाव विजय स्तंभ – पुणे स्टेशन
८. बससेवा क्रमांक ८:
पुणे स्टेशन – स्वारगेट – इस्कॉन मंदिर – रावेत – मोरया गोसावी मंदिर (चिंचवड) – प्रतिशिर्डी – शिरगावदेहुगाव – गाथामंदिर – भंडारा डोंगर पायथा – स्वारगेट – पुणे स्टेशन
९. बससेवा क्रमांक ९:
स्वारगेट – पौडगाव – श्री सत्य साईबाबा महाराज आश्रम (हाडशी) – चिन्मय विभूती योग साधना केंद्र – कोळवण – स्वारगेट
१०. बससेवा क्रमांक १०:
स्वारगेट – भोसरी – चाकण – क्रांतीवीर हुतात्मा राजगुरू स्मारक – सिद्धेश्वर मंदिर – राजगुरूनगर – श्री क्षेत्र खंडोबा मंदिर (निमगाव दावडी) – संत ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ – श्री गजानन महाराज मठ (आळंदी) – स्वारगेट
बुकिंग व अधिक माहितीसाठी:
तिकिट बुकिंग डेक्कन, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर, भोसरी, निगडी व मनपा भवन येथील पास केंद्रांवर करता येईल. अधिक माहितीसाठी समन्वयक नितीन गुरव (मो. ९८५०५०९८६२) यांच्याशी संपर्क साधावा.
पीएमपीएमएलने नागरिकांना आवाहन केले आहे की, या उन्हाळी सुट्यांमध्ये पर्यावरणपूरक, आरामदायी व सांस्कृतिक अनुभव देणाऱ्या या पर्यटन बससेवेचा लाभ घ्यावा.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार