पुणे, ३ फेब्रुवारी २०२६ :महाराष्ट्र शासनाने पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून तो तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे.
पूर्वी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्याकडे होते. त्यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. प्रशासनिक कामकाजात सातत्य राखण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार, पूर्वीच्या आदेशात आवश्यक बदल करून पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यांतील विकासकामे, आढावा बैठका आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे की हा शासन निर्णय अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून तो डिजिटल स्वाक्षरीसह निर्गमित करण्यात आला आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे आधीच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. आता पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर या नियुक्तीकडे लक्ष लागले आहे.

More Stories
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती