September 12, 2025

स्वारगेट केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई करा; भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची पुणे महापालिकेकडे मागणी

पुणे, २० मे २०२५: सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटकडे जात असलेल्या एका नागरिकावर लटकत्या इंटरनेट केबलचा तुटलेला भाग अचानक कोसळल्याने गंभीर दुखापत झाल्याची घटना आज घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले.

घाटे यांनी निवेदनात पुढील प्रमुख मागण्या केल्या:

* पुणे शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते, चौक व गल्ल्यांतील केबल्स, विशेषतः इंटरनेट व केबल टीव्हीच्या तारा, यांचे तातडीने तांत्रिक ऑडिट करण्यात यावे.
* अनधिकृतपणे टाकलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या केबल्सची यादी तयार करून त्यावर त्वरित कारवाई करावी.
* संबंधित कंपन्यांना नोटीस देऊन जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटनांवर प्रतिबंधक उपाययोजना आखाव्यात.
* महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष हेल्पलाईन वा पोर्टल सुरु करावे, जिथे नागरिक अशा धोकादायक केबल्सची माहिती देऊ शकतील.

या शिष्टमंडळात माजी नगरसेविका मानसी देशपांडे, सुशील मेंगडे, विशाल पवार, प्रतुल जागडे आणि विजय गायकवाड यांचा समावेश होता. विद्युत विभागाच्या शेकटकर यांनी महापालिकेच्या वतीने निवेदन स्वीकारले.