May 12, 2024

पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत दहा संघ सहभागी

पुणे, 20 सप्टेंबर 2023: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत दहा संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सनराईज क्रिकेट स्कुल व सहारा क्रिकेट अकादमी येथील मैदानावर 21 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना,ए के स्पोर्टस, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, सहारा क्रिकेट अकादमी, 22 यार्डस क्रिकेट अकादमी, राहुल क्रिकेट अकादमी, बी अ स्पोर्टस, सनराईज क्रिकेट स्कुल,  पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी (पीबीकेजेसीए), पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट क्लब हे 10 संघ झुंजनार आहेत.
तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे सामने 45 षटकांचे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाला करंडक, पदक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर यांना आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती अभिषेक अग्रवाल यांनी दिली.