October 5, 2024

प्रेक्षकाने सुप्रिया सुळेंना सुनावले, गडकरींचे आभार मानलेच पाहिजेत

पुणे, २१ सप्टेंबर २०२४ : पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये महामार्ग उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे भाषणासाठी उभ्या राहिल्या. उपस्थितांनी घोषणाबाजी सुरु केली. सुळे म्हणाल्या, गडकरींचे आभार मानले पाहिजेत. त्याच वेळी एका प्रेक्षकाने आभार मानलेच पाहिजेत असे सुनावले. त्यामुळे संतापलेल्या सुळे यांनी मी उत्तर देऊ शकते, पण हे ते व्यासपीठ नाही असे सांगून वेळ मारून नेली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पालखी मार्ग, राष्ट्रीय महामार्गाचे सेवा रस्ते याचे आज सकाळी पुण्यात उद्‍घाटन झाले. त्यावेळी हा प्रकार घडला. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा उपस्थितांमधून घोषणाबाजी सुरू झाली.यामध्ये जय श्रीरामसह अनेक घोषणा देण्यात आल्या. यावेळी स्वत: नितीन गडकरी यांच्यासह देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि चंद्रकांत दादा पाटील उपस्थितांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, उपस्थितांनी घोषणाबाजी काही थांबवली नाही. उलट काहीवेळ सुप्रिया सुळे यांना आपलं भाषण थांबवावं लागलं.

सुळे म्हणाल्या, मी गडकरींचे आभार मानते, तेव्हड्यात उपस्थितांमधील एका व्यक्तीने मानलेचं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. सुळे भाषणावेळी उभ्या राहिल्या त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. घोषणा देणाऱ्यांना थांबवण्यासाठी खुद्द फडणवीस आणि गडकरींनीही प्रयत्न केले पण घोषणा सुरूच होत्या. या सर्व घोषणांचा प्रकार पाहून सुप्रिया सुळेही काहीशा नाराज झाल्या आणि संतप्तही दिसून आल्या. त्या म्हणाल्या मी सुद्धा उत्तर देऊ शकते. पण ते हे व्यासपीठ नाही. आपण पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार मानण्यासाठी एकत्र आलो आहोत. तसंच, रस्त्यांवरूनही त्यांनी चांगलेच टोमणे मारले. गडकरींनी केलेले रस्ते फक्त चांगले नाही तर टीकावू आहेत. बाकी रस्त्यांची अवस्था तर माहिती आहेच. परंतु, त्यावर येथे नाही तर इतर कुठल्या ठिकाणी बोलता येईल असंही त्या यावेळी म्हणाल्या.