पुणे, दिनांक २६ जुलै : सुप्रसिद्ध वास्तुविशारद व ए अँड टी कन्सल्टंटस या संस्थेचे सहसंस्थापक विकास अचलकर यांची इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, पुणे सेंटरच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस ही वास्तुविशारदांची देशपातळीवरील अग्रगण्य संस्था आहे. सुमारे ५५० हून अधिक वास्तुविशारद संस्थेच्या पुणे सेंटरचे सभासद आहेत.
सीतेश अग्रवाल यांची उपाध्यक्षपदी तर शैलेश दनदने व मंगेश गोटल यांची अनुक्रमे मानद सचिव व मानद खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांचा काळ २०२३ ते २०२५ असा दोन वर्षांचा असेल. हृषीकेश कुलकर्णी, विवेक गारोडे, जितेंद्र ठक्कर, अमित खिवंसरा, मिलिंद पांचाळ, महेश बांगड, रीना साळवी, कपिल जैन व सुरभी गडकरी आदी वास्तुविशारदांना नव्या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?