पुणे, २४ डिसेंबर २०२४ः पर्वती जलकेंद्राच्या हरकानगर भवानी पेठ जलवाहिनीचे काम व समान पाणी पुरवठा योजनेच्या काम गुरुवारी (२६ डिसेंबर) करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवार पेठ, गुरुवार पेठेसह शहराचा पूर्व भागामध्ये गुरुवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२७ डिसेंबर) पाणी पुरवठा उशीरा व कमी दाबाने होईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे ः पर्वती एमएलआर टाकी परिसर ः शंकर शेठ रोड परिसर, छ त्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, सोमवार पेठ, लोहिया नगर, जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहामागील परिसर, पर्वती दर्शन व मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टिमवी कॉलनी,मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा चित्रपटगृह परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी.

More Stories
नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे योगदान: विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील
अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीवर महापौर आक्रमक; पोलिसांना १५ दिवसांचा अल्टिमेटम