पुणे, ११ आॅगस्ट २०२४: मुंबईतल्या अनेकांना माज आला आहे. तो माज उतरविण्याचे औषध माराठ्यांजवळ आहे. त्यामुळे एकदा मुंबईत जायचे आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातले लई वळू माजलेत त्यांचा माज एकदा नक्की उतरवू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कात्रजमध्ये शांतता रॅलीतील सभेत बोलताना राजकीय नेत्यांना दिला.
समस्त कात्रज ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा कात्रज चौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
जरांगे म्हणाले, ‘एक मुलगा म्हणून लढतोय. आज जास्त काही बोलणार नाही. मी मरणाच्या दरात उभा आहे. खोटं बोलणार नाही. मागे हटणार नाही. आपली लेकरं मोठी करायची आहेत. राजकीय पक्ष आणि नेते मोठे करायचे नाहीत. माझा समाज मोठा झाला पाहिजे हा माझा आट्टहास आहे. बरेचजण म्हणायचे मराठे एक नाहीत. पण, पुणे कात्रजकरांची पाठ थोपटली पाहिजे. मी बोलतो ते करून दाखविणार लई जणांना वाट दाखविणार! आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही आणि हतायचे नाही. सर्वजण अशीच एकजूट दाखवा.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान