October 26, 2025

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्व स्वीकारतील का… पहा काय म्हणाले संजय राऊत

पुणे, २७/०१/२०२५: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारतील आणि अशी छुपी रणनीती सुरू असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितल आहे.याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की रवी राणा यांची जे.पी. नड्डा यांच्या जागी नेमणूक करण्यात आली आहे का शिवसेना हा स्वतंत्र पक्ष असून शिवसेनेला एक मोठी परंपरा आहे.जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा या व्यक्तीचा जन्म देखील झाला नव्हता असा टोला यावेळी राऊत यांनी रवी राणा यांना लगावला आहे.

पुण्यात आज शिवसेना शहर तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की लोकसभा,आणि विधानसभा निवडणुकीनंतर संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देणे गरजेचं आहे.आणि उद्या महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने पुणे शहर पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली आणि या बैठकीच्या माध्यमातून चर्चा देखील करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत काही पदाधिकारी यांनी स्वबळाचा नारा दिला तर काहीनी महाविकास आघाडीसोबत लढल पाहिजे अस सांगितल आहे. पुणे महानगरपालिका आम्ही पूर्ण ताकतीने लढणार आहोत आमची महाविकास आघाडी असून तुम्ही महाविकास आघाडीच्या माग का लागले आहे. महाविकास आघाडी ही विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार झाली आहे तर इंडिया आघाडी लोकसभेसाठी तयार झाली आहे आता याचा वापर आम्ही स्थानिक पातळीवर कशा पद्धतीने करू हे तीन पक्षातील नेते एकत्र बसून करतील अस यावेळी राऊत म्हणाले.