पुणे, १६ एप्रिल २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीचे यंदा त्रिशताब्दी वर्ष असून त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. अहिल्यादेवींच्या कार्याचे स्मरण करत, त्यांनी समाजहितासाठी घेतलेल्या भूमिकांचा जागर करत अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने शिवमल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक ३०० या उपक्रमाद्वारे धनगरी नाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात ५० हजार धनगरी ढोल वाजवून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
पडळकर यांची पत्रकार परिषद बुधवाकरी (ता. १६) पुण्यात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पडळकर म्हणाले, “समजात काही मोजक्याच समाजांना सांस्कृतिक वारसा आहे, ज्यात धनगर समाजाचा ही समावेश आहे. धनगर समाजाकडे ज्या चालीरीती आहे त्या अफलातून आहे आणि धनगरी ढोल हा आमचा आत्मा आहे. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांच्या जंयतीच्या पार्शभूमिवर पुण्यात मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात एकाच वेळी ५० हजार धनगरी ढोल वाजवून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत.”
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मात्र बोलवणार नसल्याचं सांगत हा कार्यक्रम राजकीय नसून कोणाला बोलवावे हे समाजाला विचारून कळवू अस यावेळी पडळकर म्हणाले.
हा कार्यक्रम पुण्यातील रेस कोर्स मैदानावर पार पडणार आहे.
एमपीएससीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू ः
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून या विद्यार्थ्यांचे विषय सोडलेले नाहीत. एमपीएससीमध्ये आत्ता अनेक पुढारी तयार झाले आहेत. विद्यार्थ्यांनी जर त्यांचा विषय दिला तर मुख्यमंत्री यांच्याशी नक्की बोलू. राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा क्लासेस बद्दल मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे. असेही पडखळकरांनी यावेळी नमूद केले.
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार