पुणे, 27 फेब्रुवारी 2024: यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवारपासून बदल करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या व जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन लेनमध्ये तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन लेनमध्ये वाहतूक करावी.
या वाहतूकीच्या बदलामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय