May 3, 2024

विद्यापीठात ज्येष्ठ नागरिकांची ‘वॉक आणि जॉग’ स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे, 27 फेब्रुवारी 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून यानिमित्त विद्यापीठात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वॉक आणि जॉग’ म्हणजेच चालण्याच्या आणि धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करणायात आले होते. विद्यापीठातील माजी प्राध्यापक तसेच त्यांच्या कुटुंबातील ६० वर्षावरील सदस्यांसाठी आयोजित या स्पर्धेचे उद्धाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी धावपटू आशिष कसोडेकर, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे विभाग प्रमुख आणि संचालक डॉ. विलास आढाव उपस्थित होते.

सिंपल स्टेप्स फिटनेस प्रा. लि. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ३, ५ आणि १० किलोमीटर अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. तसेच व्हिलचेअरवरील दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठीही ३ किलोमीटर या गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २५० ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ही स्पर्धा रविवारी (२५ फेब्रुवारी) विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झाली.