इंदापूर, ७ आॅक्टोबर २०२४: तुम्ही यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा असं म्हणत शरद पवार यांनी पक्षप्रवेश सोहळ्यातचं हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी पवार बोलताना म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांनी कोणतीही जबाबदारी द्या म्हणून मागणी केली आहे. आता ते म्हणतात कोणतीही. तर कोणतही काम करण्यासाठी यांची काय गरज आहे. तुम्ही लोकांच्या हिताचे काम करा, प्रश्न सोडवा असेच काम आपल्याला दिलं पाहीजे. ती जबाबादारी आपल्या लोकांवर आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा असं म्हणत पवारांनी एकप्रकारे हर्षवर्धन पाटलांची उमेदवारीच जाहीर केली आहे.
मी ६७ मध्ये विधानसभेत आलो. तेव्हा मी २७ वर्षाचा होतो. विधीमंडळात काम कसं करावं, व्यक्तिगत भूमिका स्वच्छ कशी ठेवायची याचा आदर्श आम्ही शंकरराव भाऊंचा असायचा. ते वडीलधारी होते. त्यांचा अधिकार असायचा. नंतर त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. मंत्रिमंडळात स्वच्छ आणि नेटका कारभार कसा करायचा हा आदर्श आम्हाला भाऊंनी दिला. पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा शंकरराव भाऊंशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या विचाराचा वारसा हर्षवर्धन घेऊन जात आहेत, असे शरद पवार म्हणाले.
वेगळी दिशा देण्याचं काम
मागच्या निवडणुका झाल्या. पुणे जिल्हा आणि राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात सर्व जातीच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं, असा माझा हेतू होता. त्याच हेतूने इंदापूरकडे माझं लक्ष गेलं होतं. इंदापूरच्या एका सहकाऱ्याला जिल्ह्याचं प्रमुख केलं, त्याला विधानसभेत नेलं, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. इंदापूर तालुक्यातील दुष्काळ, कारखानदारीची वाढ करणारा सहकारी असला पाहिजे, म्हणून ही भूमिका घेतली. पण अलिकडच्या कालावधीत जे काही ऐकलं त्याने धक्का बसला असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.
More Stories
Pune: १३९ कोटींच्या सुरक्षा रक्षक निविदेस मंजुरी, दोन टक्के वाढीव दरने मंजूरी
पुणे: ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन
Pune: खासदार मुरलीधर मोहोळ यांचे 24×7 नागरी सेवा देणारे अत्याधुनिक कार्यालय