May 19, 2024

चौथ्या पुना क्लब गोल्फ लीग स्पर्धेत 180 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 17 फेब्रुवारी 2023: पुण्यातली सर्वाधिक यशस्वी आणि चर्चित अशा चौथ्या पुना क्लब गोल्फ लीग वार्षिक स्पर्धेत पुण्यातील 180 गोल्फपटूंनी आपला सहभाग नोंदवला असून त्यांची 12 संघामध्ये विभागणी करण्यात आली आहे.

स्पर्धेवषयीअधिक माहिती देताना पुना गोल्फ क्लबचे समन्वयक इंद्रनील मुजगुले यांनी सांगितले की, यंदाची स्पर्धा हि याआधीच्या सर्व स्पर्धांपेक्षा भव्य स्वरूपात होणार आहे. तसेच, हि स्पर्धा अ फोरसम (अल्टरनेट शॉट),  ब फोर बॉल(बेटर बॉल) अशा दोन फॉरमॅट मध्ये खेळली जाणार आहे.

ते पुढे म्हणाले की, या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच हि केवळ खेळाडूंमध्येच नव्हे तर प्रमुख प्रायोजकांमध्येही कमालीची लोकप्रिय स्पर्धा ठरली आहे. यामध्ये स्पर्धेला आर्थिक साहाय्य करणाऱ्या प्रायोजकांमध्ये खाद्यपेय विक्रेते व उपहार गृहे , क्रेडिट कार्ड कंपनी आघाडीचे  बांधकाम व्यावसायिक आणि ऑटोमोबाईल वितरक यांचा समावेश आहे.

या सर्व 12 संघांच्या खेळाडूंची लिलाव अत्यंत आकर्षक किमंतीत 14 जानेवारी 2023 रोजी पार पडला होता. यामध्ये मिहीर कदम या खेळाडूला सर्वधिक 69लाख किंमत मिळाली. अमन ओसवाल (11वर्षे) हा स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा, अरुण देवस्कर (79वर्षे) हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरले आहेत. या स्पर्धेचे हे चौथे सत्र असुन 19 फेब्रुवारी ते 5मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. लेक्सिकॉन लॉर्ड ऑफ द आर्यन हा संघ गतवर्षीच्या मालिकेतील विजेता संघ आहे.

पुना गोल्फ लीग 2023 स्पर्धेसाठी वैशाली रेस्टॉरंट हे प्रमुख प्रायोजक आहेत. वैशालीचे भूतपूर्व मालक स्वर्गीय जगन्नाथ शेट्टी हे स्वतः गोल्फपटू व गोल्फप्रेमी होते. त्यांनी या स्पर्धेला प्रायोजकत्व  देण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती त्यांनी दिली.

गतवर्षी ही स्पर्धा गोल्फपटुंकरितासाठीच नव्हे तर विविध संघांच्या प्रायोजकांसाठी खास ठरली होती. यंदाच्या स्पर्धेचे सह प्रायोजक म्हणुन ग्लेनफिडीच, अपेक्स लिंक्स आणि 24 के बाय कोलते पाटील यांचा सहभाग असुन एफिंगट बेव्हरेजस लिमिटेड आणि कोठारी कार्स हे अन्य प्रायोजक आहेत. तसेच यंदा तीन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.

इंद्रनील मुजगुले पुढे म्हणाले की, या निमित्ताने सहभागी खेळाडू आमचे सर्व प्रायोजक आणि वेगवेगळ्या निमित्ताने आमच्याशी जोडल्या गेलेल्या सर्व हितचिंतकांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. पुना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, इक्रम खान(गोल्फ कॅप्टन), पद्मजा शिर्के(लेडी कॅप्टन), उपाध्यक्ष गौरव गढोके, व्यवस्थापन प्रतिनिधी आदित्य कानिटकर आणि क्लबच्या व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांचे तसेच, गोल्फ  उपसमिती प्रशासन यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्या सहकार्यामुळे व परिश्रमामुळे दरवर्षी हि स्पर्धा प्रचंड प्रमाणात यशस्वी होते आहे.

स्पर्धेतील सहभागी संघांची नावे, प्रायोजक व मालक पुढीलप्रमाणे:
अडवानी सुपरकिंग्ज (अडवानी प्रॉपर्टीज एलएलपी – अनिल अडवानी);
ऑटोमेक बेकर्स(ऑटोमेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड – अतीन अगरवाल);
शिर्के द अँग्री बर्डीज(बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड – जय शिर्के);
डिमांड फार्म माव्हरिक्स(मात्रा ग्रोथ सोल्यूशन एलएलपी – अभिजीत गंगोली);
हिलियॉस ईगल्स(डूवेन पार्क प्रायव्हेट लिमिटेड – सलील भार्गवा);
किर्लोस्कर लिमिटलेस रेंजर्स (किर्लोस्कर प्रोप्रायटरी लिमिटेड – अतुल किर्लोस्कर);
के के रॉयल्स(खांबेटे कोठारी कॅन्स  अँड अलाईड प्रोडक्टस – अमित कोठारी);
लेक्सिकॉन लॉर्ड ऑफ द आर्यन्स(लेक्सिकॉन लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड – पंकज शर्मा);
मानव पेरीपिन सिकर्स(मानव लँडमार्क अँड प्रिसिजन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंडिया लिमिटेड(पारी)- रुपेश बांठीया व रणजीत दाते);
मनप्रीत अँड जीजी जॅग्वार्स (जीजी इन्फ्रा अँड वाईन एंटरप्रयझेस प्रायव्हेट लिमिटेड – गौरव गढोके व मनप्रीत उप्पल);
पिनाकी वॉरियर्स (पिनाकी एम्प्रेसेस प्रायव्हेट लिमिटेड – सुनिल गुट्टे);
द होली वन्स व्हस्कॉन( व्हस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड – वासुदेवन आर);

स्पर्धेचे वेळापत्रक पुढीप्रमाणे:
19 फेब्रुवारी 2023 – ड्रॉ समारंभ,  टिपिंग, पटिंग आणि ड्रायव्हिंग स्पर्धा होणार;
25 व 26 फेब्रुवारी – सांघिक स्पर्धा;
3 व 4 मार्च – सांघिक स्पर्धा;
5मार्च – अंतिम फेरी.