May 10, 2024

दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत मनिषा रॉयल्स व रॉकेट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे, 17 सप्टेंबर, 2023: पुना क्लब लिमिटेड आयोजित मनिषा कन्स्ट्रक्शन प्रायोजित दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत उपांत्य फेरीत मनिषा रॉयल्स व रॉकेट्स या संघांनी अनुक्रमे संघवी शूटर्स व टॉर्नेडोज या संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पुना क्लब स्नूकर हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात मनिषा रॉयल्स संघाने संघवी शूटर्स संघाचा 3-1 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. 15 रेड हॅंडिकॅप स्नूकरमध्ये मनिषा रॉयल्सच्या रोहींगटन इराणीला संघवी शूटर्सच्या संजय संघवीने 73-84 असे पराभूत करून संघाचे खाते उघडले. 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरीत मनिषा रॉयल्सच्या मिनु करकरियाने अंगद सहानीच्या साथीत संघवी शूटर्सच्या शाहबेहराम रब्बानी व अश्रफ परवानी यांचा 70-40 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. हॅंडिकॅप बिलियर्ड्स 200पॉईंट्समध्ये मनिषा रॉयल्सच्या आरके शर्माने धीरज कोचरचा 200-190 असा तर 6रेड हॅंडिकॅप स्नूकरमध्ये कुणाल वासवानीने संघवी शूटर्सच्या गिरीश दामलेचा 60-22, 38-36 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रॉकेट्स संघाने टॉर्नेडोज संघाचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून सूरज राठी, कपिल पंजाबी, राहुल बग्गा यांनी सुरेख कामगिरी केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
रॉकेट्स वि.वि.टॉर्नेडोज 3-1(15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: सूरज राठी वि.वि.अनिल काकडे 83-26; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: वैभव शहा/रोहित चोप्रा पराभुत वि.विशाल अरोरा/फारूख मोदी 85-87; हॅंडिकॅप बिलियर्ड्स 200 पॉईंट्स: कपिल पंजाबी वि.वि.आकाश दलवानी 200-100; 6 रेड हॅंडिकॅप स्नूकर: राहुल बग्गा वि.वि. पंकज परमार 41-39, 51-39);

मनिषा रॉयल्स वि.वि.संघवी शूटर्स 3-1(15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: रोहिगटन इराणी पराभुत वि.संजय संघवी 73-84; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: मिनु करकरिया/अंगद सहानी वि.वि.शाहबेहराम रब्बानी/अश्रफ परवानी 70-40; हॅंडिकॅप बिलियर्ड्स 200पॉईंट्स: आरके शर्मा वि.वि.धीरज कोचर 200-190; 6रेड हॅंडिकॅप स्नूकर: कुणाल वासवानी वि.वि.गिरीश दामले 60-22, 38-36).