May 18, 2024

दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत मनिषा रॉयल्स संघाला विजेतेपद

पुणे, 20 सप्टेंबर, 2023: पुना क्लब लिमिटेड आयोजित मनिषा कन्स्ट्रक्शन प्रायोजित दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत अंतिम फेरीत मनिषा रॉयल्स संघाने रॉकेट्स संघाचा 3-1 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पुना क्लब स्नूकर हॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मनिषा रॉयल्स संघाने रॉकेट्स संघाचा 3-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 15 रेड हॅंडिकॅप स्नूकरमध्ये मनिषा रॉयल्सकडून रोहिंगटन इराणीने रॉकेटसच्या राहुल बग्गाचा 81-57 असा तर,15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरीत मनिषा रॉयल्सकडून मिनु करकरियाने अंगद सहानीच्या साथीत वैभव शहा व रोहित चोप्रा यांचा 84-81 असा पराभव संघाला आघाडी मिळवून दिली. हॅंडिकॅप बिलियर्ड्स 200पॉईंट्समध्ये मनिषा रॉयल्सकडून आरके शर्माला रॉकेटसच्या कपिल पंजाबीने 74-200 असे पराभुत करुन ही आघाडी कमी केली. 6रेड हॅंडिकॅप स्नूकरमध्ये मनिषा रॉयल्सकडून कुणाल वासवानीने सूरज राठीचा 47-05, 36-45, 46-07 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील विजेत्या मनिषा रॉयल्स संघाला स्वर्गीय शांतीलाल लाल संघवी स्मृती करंडक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष सुनील हांडा, उपाध्यक्ष गौरव गढोके आणि मनिषा कन्स्ट्रक्शनचे संचालक राजन खिंवसरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय संघवी, मुकेश संघवी, स्पर्धा संचालक कपिल पंजाबी, रणजीत पांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
मनिषा रॉयल्स वि.वि.रॉकेट्स 3-1(15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: रोहिंगटन इराणी वि.वि.राहुल बग्गा 81-57;

15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: मिनु करकरिया/अंगद सहानी वि.वि.वैभव शहा/रोहित चोप्रा 84-81;

हॅंडिकॅप बिलियर्ड्स 200पॉईंट्स: आरके शर्मा पराभुत वि. कपिल पंजाबी 74-200;

6रेड हॅंडिकॅप स्नूकर: कुणाल वासवानी वि.वि.सूरज राठी 47-05, 36-45, 46-07)

इतर पारितोषिके:
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर(15रेड स्नुकर): सुरज राठी;
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर(बिलियर्ड्स): कपिल पंजाबी;
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर(6 रेड स्नूकर): कुणाल वासवानी;
हायेस्ट ब्रेक 15 रेड स्नुकर: सुरज राठी;
हायेस्ट ब्रेक बिलियर्ड्स: कपिल पंजाबी;
जोडी ऑफ द टुर्नामेंट: अनिकेत संघवी व आशिष पटेल;
शार्पशूटर ऑफ द टुर्नामेंट: सुरज राठी;
व्हर्सटाईल प्लेअर: अंगद सहानी;
मोस्ट स्पिरीटेड परफॉर्मन्स: संजय संघवी;
रॉकस्टार ऑफ द टुर्नामेंट: डॉ. रूसी मरोलिया;
उदयोन्मुख खेळाडू: अयान खान.