May 11, 2024

40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

नवी मुंबई, 26 डिसेंबर, 2023: नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली आणि गणेश नाईक यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत वैदेही चौधरी, सहजा यमलापल्ली यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आणले.

वाशी येथील गणेश नाईक टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत रशियाच्या एकतेरिना याशिनाने ग्रीसच्या चौथ्या मानांकित सॅपफो साकेल्लारिडीचा 6-4, 2-6, 7-5 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. रशियाच्या डारिया कुडाशोवाने तिसऱ्या मानांकित लिथूनियाच्या जस्टिना मिकुलसायटेचा 6-2, 1-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. जपानच्या नाहो सातोने भारताच्या आठव्या मानांकित सहजा यमलापल्लीचा 6-2, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अव्वल मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवा हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताच्या वैदेही चौधरीचा 6-2, 6-1 असा तर, सहाव्या मानांकीत लात्वियाच्या डायना मार्सिचेविकाने जपानच्या फुना कोजाकीचा 6-4, 7-5 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीने भारताच्या ऋतुजा भोसले व प्रार्थना ठोंबरे या तिसऱ्या मानांकित जोडीचा 7-6(1), 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. लात्वियाच्या कॅमिला बारटन व रशियाच्या एकतेरिना मकारोवा यांनी भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती व वैदेही चौधरी यांचा 6-2, 3-6, 10-5 असा पराभव करून पुढच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले.

निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी: एकेरी:
डायना मार्सिचेविका (लात्विया)[6]वि.वि.फुना कोजाकी(जपान) 6-4, 7-5;
एकतेरिना याशिना (रशिया) वि.वि. सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस) [4]6-4, 2-6, 7-5;
एकतेरिना मकारोवा(रशिया)[1] वि.वि.वैदेही चौधरी(भारत)6-2, 6-1;
डारिया कुडाशोवा वि.वि. जस्टिना मिकुलसायटे(लिथुनिया)[3] 6-2, 1-6, 6-1;
साकी इमामुरा(जपान)वि.वि.झिबेक कुलंबयेवा(कझाकस्तान)6-2, 6-1;
मिसाकी मत्सुदा (जपान)वि.वि.अकिको ओमाय(जपान)6-0, 6-0;
नाहो सातो (जपान) वि.वि. सहजा यमलापल्ली(भारत)[8] 6-2, 6-4;
मोयुका उचिजिमा(जपान)[2]वि.वि.एकतेरिना मकलाकोवा(रशिया) 5-7, 6-1, 6-3;

दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
कॅमिला बारटन(लात्विया)/एकतेरिना मकारोवा(रशिया)वि.वि.श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती(भारत)/वैदेही चौधरी(भारत) 6-2, 3-6, 10-5;
हिरोमी आबे (जपान)/साकी इमामुरा(जपान)वि.वि. बीट्रिस गुमुल्या(इंडोनेशिया)/अकिको ओमाई(जपान)6-3, 6-2;
फुना कोजाकी (जपान)/मिसाकी मात्सुदा(जपान)वि.वि. ऋतुजा भोसले(भारत)[3] /प्रार्थना ठोंबरे(भारत)7-6(1), 6-2;
डायना मार्सिचेविका(लात्विया)[2] /सॅपफो साकेलारिडी (ग्रीस)वि.वि. झील देसाई (भारत)/ क्सेनिया झायत्सेवा(रशिया) 4-6, 7-6(3), 12-10.