May 11, 2024

पहिल्या पीडीएफए फुटसाल लीग स्पर्धेत डेक्कन इलेव्हनचा दुसरा विजय

पुणे, 28 डिसेंबर 2023: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए) यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीडीएफए फुटसाल लीग स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन इलेव्हन संघाने सलग दुसरा विजय मिळवला.
बावधन येथील हॉटफूट येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन इलेव्हन संघाने रेंजहिल्स संघाचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला. डेक्कन इलेव्हन संघाकडून मैत्रेय रावल(1,2 मि.)ने दोन गोल तर, यश जगताप(3 मि.), राज मिश्रा(4 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पराभुत संघाकडून श्रीतेज इंगळे(6,15 मि)ने दोन गोल, दिव्यंजीत देशमुख(12 मि.)ने एक गोल केला.
दुसऱ्या सामन्यात सिटी एफसी पुणे संघाने एफसी बेकडीनो संघाचा 15-3 असा धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. सिटी एफसी पुणे संघाकडून प्रितेश बाबर(5,6,9,10,11,15मि)याने सर्वाधिक सहा गोल केले.
अन्य लढतीत कुणाल देशमुख(2,3 मि.), यश भोसले(1, 6 मि) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर रिअल पुणे युनायटेड संघाने एफसी बेकडिनो संघाचा 6-1 असा पराभव करून पहिला विजय मिळवला
निकाल: साखळी फेरी:
सिटी एफसी पुणेः 15(प्रितेश बाबर 5,6,9,10,11,15मि., शुभम गायकवाड 2,7,14मि., सॅटलॉन ए. 1,3मि., अब्बास के. 8,12 मि., स्वप्नील महामुनी 13मि., रोहित रावत 4 मि.) वि.वि.एफसी बेकडिनो: 3 (अनुराग पैठणे 2 मि., सिद्धार्थ चव्हाण 9 मि., आदित्य दिघे 20 मि.);
डेक्कन इलेव्हन: 4 (मैत्रेय रावल 1,2 मि., यश जगताप 3 मि., राज मिश्रा 4 मि.) वि.वि.रेंज हिल्स: 3 (श्रीतेज इंगळे 6,15 मि., दिव्यंजीत देशमुख 12 मि.)
रिअल पुणे युनायटेड: 6 (कुणाल देशमुख 2.3 मि., यश भोसले 1, 6 मि., हृतिक पाटील 5 मि., अविनाश पोद्दार 4 मि.) वि.वि.एफसी बेकडिनो: 1 (आदित्य दिघे 7 मि.);