May 16, 2024

पहिल्या जेके ईसीए एकदिवसीय फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत 420 खेळाडू सहभागी

पुणे, 12 ऑगस्ट, 2023: एक्सलंस चेस अकादमी यांच्या वतीने आयोजित पहिल्या जेके ईसीए एकदिवसीय फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातून 420 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा कोद्रे फार्म, सिंहगड रोड येथे रविवार, 13 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.
स्पर्धेच्या संचालिका जुईली कुलकर्णी यांनी सांगितले की, हि स्पर्धा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण 4,00,000/-रुपयांची पारितोषिके प्रदान  करण्यात येणार आहेत. स्पर्धेत 420अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धेत सहभागी मानांकित खेळाडूंमध्ये विष्णू प्रधान व्ही, मित्रभा गुहा, दिपेन चक्रवर्ती जे, कुशाग्र मोहन, रोश जैन, रत्नाकरण के, कार्तिकेयन पी., विक्रमादित्य कुलकर्णी, ऋत्विज परब, आकाश दळवी, आदित्य गंपा, कशिश जैन, शरण राव, हर्षिता गुद्दंती, अक्षय बोरगावकर, आर्यन देशपांडे, गौरव झगडे, ऋत्विक कृष्णन यांचा समावेश आहे. चीफ आरबीटर आयए राजेंद्र शिदोरे आणि डेप्युटी चीफ आरबीटर आयए दिप्ती शिदोरे हे काम पाहणार आहे.विशेष म्हणजे अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणाऱ्या आरबीटर जुईली कुलकर्णी या पहिल्याच संयोजिका आहेत.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व 50000रुपये, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व 35000रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.